मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अमित साटम यांना संधी देऊन आक्रमक व अभ्यासू चेहरा दिला. मुंबईतील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती ही घोषणा करण्यात आली. या पदासाठी प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा होती.
अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळी विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगलीच जाण आहे.
याअगोदर या पदावर मंत्री आशिष शेलार यांनी काम बघितले. त्यानंतर भाजपने या पदासाठी साटम यांची निवड केली. गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोणाची निवड केली जाते. याकडे सर्वांचे लक्ष होते.