पाटणा (बिहार) – क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू आपली कामगिरी दाखवत असतात. तसेच त्यामध्ये विजय-पराजय होतच असतो. तो खिलाडूवृत्तीने घ्यावा लागतो. परंतु काही वेळा स्पर्धे बाहेरची मंडळी यात हस्तक्षेप करून दादागिरी करतात. असाच एक प्रसंग झारखंडमध्ये घडला. रांचीमध्ये एका क्रीडा स्पर्धेदरम्यान भाजप खासदाराने कुस्तीपटूला थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रांची येथील शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियममध्ये अंडर-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीदरम्यान ही घटना घडली. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कुस्तीपटू यूपीचा असून, कुस्ती स्पर्धेसाठी त्याचे वय जास्त असल्याने त्याला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांनी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना स्पर्धेत भाग घेण्याची विनंती करताच, खासदाराने या कुस्तीपटूला दोनदा थप्पड मारली, घटनेनंतर लगेचच या पैलवानालाही मंचावरून हटवण्यात आले.
https://twitter.com/Anjan94150697/status/1472092308258521088?s=20
झारखंड कुस्ती संघटनेने सांगितले की, त्याच्याकडे कुस्तीपटूचा कोणताही तपशील नाही कारण त्याला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नव्हती. तसेच खासदारांनी आपल्या कृतीचा बचाव करताना सांगितले की, कुस्तीपटूच्या वयाच्या फसवणुकीचे प्रकरण आहे. हा स्पर्धक मंचावर आला आणि वयाच्या फसवणुकीत दोषी आढळल्यास त्याला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले.
तसेच आम्ही त्याला परवानगी दिली नाही आणि नम्रपणे मंचावरून खाली येण्यास सांगितले. कारण आम्ही आधीच वयाच्या फसवणुकीच्या प्रकरणात आणखी ५ कुस्तीपटूंना अपात्र ठरवले आहे आणि ते ५ जण यूपीचे आहे. फक्त यूपीचेच नाही, आम्ही दिल्ली, हरियाणा किंवा कोणत्याही राज्याच्या कोणत्याही वयाच्या खेळाडूला परवानगी दिली नाही.
भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विंदो तोमर म्हणाले की, आमच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की, तो खेळाडू यात सहभागी होऊ शकत नाही, परंतु त्याने त्याच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि त्याला खेळण्याची परवानगी देण्यासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. तो त्याच अन्य राज्यातील म्हणजेच यूपीचा आहे, परंतु आम्ही त्याला स्पष्टपणे नकार दिला. कारण त्याला खेळण्याची परवानगी दिली तर इतर राज्यातील कुस्तीपटूंबाबत चुकीचे ठरेल.