इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील उज्जैन येथील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करतात. काहींचे एक किलोही वजन कमी होत नाही आणि या खासदाराने तब्बल ३२ किलो वजन कसे काय घटवले याचीच सध्या जोरदार चर्चा होत आहे. वजन घटविण्याचा नेमका मंत्र काय आहे, हे सुद्धा फिरोजिया यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रति किलो वजन कमी केलेल्या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांना एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप खासदार फिरोजिया म्हणाल्या, ‘मी आव्हान स्वीकारले आणि जवळपास ३२ किलो वजन कमी केले. आता उज्जैन परिसराच्या विकासासाठी तब्बल ३२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
जूनमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मंचावर खासदाराला वचन दिले की, ते घटवलेल्या प्रत्येक किलोमागे विकासकामांसाठी १ हजार कोटी रुपये देऊ. यासंदर्भात फिरोजिया म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला मंचावर सांगितले की, मला उज्जैनच्या विकासकामांसाठी प्रति किलो वजन १००० कोटी मिळतील. मी ते आव्हान म्हणून घेतले आणि आत्तापर्यंत १५ किलो वजन कमी केले आहे. मी आणखी वजन कमी करेन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना वजन कमी करण्याबाबत सांगितले. त्यांना हे कळल्यावर खूप आनंद झाला. आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी या क्षेत्रासाठी २३०० कोटी रुपयांच्या विकास योजना मंजूर केल्या आहेत.
असा आहे डाएट प्लॅन
फिरोजिया म्हणाले की, वजन कमी करण्यासाठी मी काटेकोर डाएट प्लॅन पाळतो. मी सकाळी ५.३० वाजता उठतो आणि नंतर मॉर्निंग वॉकसाठी जातो. माझ्या सकाळच्या वर्कआउटमध्ये धावणे, व्यायाम आणि योगा यांचा समावेश होतो. मी आयुर्वेदिक आहार फॉलो करतो. मी हलका नाश्ता करतो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी मी सॅलड, एक वाटी हिरव्या भाज्या आणि मिश्र धान्यापासून बनवलेली रोटी खातो. कधीकधी माझ्याकडे गाजर सूप किंवा ड्रायफ्रुट्स सुद्धा असतात.
BJP MP Lost 32 KG Weight This is a diet plan