जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुका म्हटल्यावर वाद आलाच समजा. ती साध्या सहकारी संस्थेची निवडणुक असो वा राष्ट्रपतींची निवडणुक असो. जळगाव येथील चाळीसगावमध्ये सध्या एका शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. या राजकारणात आमदार, खासदार, उद्योजक सारेच एकमेकांविरोधात भिडले आहेत. खास म्हणजे, भाजपचे खासदार आणि आमदारही एकमेकासमोर आले आहेत.
चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण सध्या तापले आहे. आत आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेश पाटील आणि माजी मंत्री सुरेश जैन या तिघांचाही समावेश आहे. संपूर्ण राजकारण या तिघांभवतीच फिरतय. कारण नसताना आमदार मंगेश चव्हाण आपल्याला एका प्रकरणात इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप खासदार उन्मेश पाटील यांनी केला आहे. तसेच उन्मेश पाटील यांनी सुरेश जैन यांच्यासोबत झालेल्या संवादाची ऑडियो क्लिपही सोशल मिडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी वातावरण तापलेलं आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी सुरेश जैन यांना फोन केल्यानंतर त्यांच्यात जो काही संवाद झाला त्याची क्लिप व्हायरल झाल्यामुळे सध्या जळगावात एकच विषय चर्चेला आहे.
‘मी आलोच नाही’
‘आमदार मंगेश चव्हाण यांनी, मी आणि ते स्वतः तुमच्याकडे सोबत आलो आणि तुमच्याशी व्यवहार केला…’अशी ऑडियो क्लिप मी ऐकली. मी आणि मंगेश चव्हाण आपल्याकडे कधीही व्यवहारासाठी एकत्र आलेलो नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने यासंदर्भातील खुलासा करा, अन्यथा पत्रकार परिषद घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा उन्मेश पाटील सुरेश जैन यांना देत असल्याची ही ऑडियो क्लिप आहे.
मंगेश चव्हाण काय म्हणाले?
‘सुरेशदादा जैन आणि आपण जी जागा विकत घेऊन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आहे, त्या जागेवरून काही लोक वाद निर्माण करीत आहेत. सुप्रीम इंडस्ट्रीजचा मालक मीच आहे. माझ्या कुटुंबातील लोक भागिदार आहेत. आणि आमदार होण्यापूर्वीपासूनच माझा व्यवसाय आहे. मी जमीन बळकावलेली नाही,’ असे मंगेश चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले.
BJP MP And MLA Fight Election Jalgaon District
Politics Unmesh Patil Mangesh Chavhan Education Chalisgaon
Audio Clip Viral