लखनऊ – उत्तर प्रदेशातील बलिया येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्र सिंह हे आपल्या विवादास्पद वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहतात. कोरोनाच्या काळात आता आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक विचित्र दावा केला आहे की, गोमूत्र सेवन केल्यामुळे कोरोना होत नाही. याचा व्हिडिओ त्यांनी बनविला असून लोकांना गोमूत्र पिण्याचे आवाहनही केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्वत: भाजपचे आमदार सुरेंद्र सिंहही गोमूत्र पिताना दिसत आहेत. तसेच त्यांनी असा दावा केला की, ते नियमितपणे गोमूत्र घेतात, त्यामुळे त्यांना कोरोना झाला नाही आणि आतापर्यंत पूर्णपणे निरोगी राहतो. गोमूत्र नियमित सेवन केल्यास कोरोना साथीचा रोग नियंत्रित होऊ शकतो.
तसेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये सुरेंद्र सिंह म्हणतात की, मला बैरिया विधानसभेच्या संपूर्ण जनतेसमोर अपील करावेसे वाटते. हा पतंजलीचा गोधन अर्क आहे. मी दररोज सकाळी रिकाम्या पोटात पाच कप थंड पाण्यात मिसळलेले गोमूत्र पितो, मला माहित नाही की त्याचे वैज्ञानिक घटक काय आहेत. पण हे प्यायल्यानंतर, कोविदपासून माझेही संरक्षण होते. ते पुढे म्हणतात की, मला खात्री आहे की, कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा नियंत्रण फक्त गोमूत्र किंवा गोधन अर्क सेवन केल्यासच होईल. गोमूत्राचे सेवन विज्ञान स्वीकारणार नाही. पण मी माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यासमोर ठेवत आहे. ‘
https://twitter.com/ANINewsUP/status/1391157168372469762