शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुधाकर बडगुजर यांचे सलिम कुत्तासोबत संबध, १७ गुन्हे…भाजपमध्ये घेण्यास सीमा हिरे यांचा विरोध

by India Darpan
जून 4, 2025 | 6:05 pm
in संमिश्र वार्ता
0
seema hire

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहे. ज्यांचे संबध दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊन नये अशी मागणी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केली.

आमदार हिरे म्हणाल्या की, बडगुजर हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असे बातम्यांमधून कळाले. आमच्यामध्ये असा कोणताही विषय नाही. चर्चा नाही. मी बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना बजगुजर यांनी त्रास दिला. आमच्या नेत्यांवर त्यांनी आक्षेपार्ह टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतींत चुकीची बातमी दिली. तसेच नारायण राणे यांना भरल्या ताटावरुन त्यांनी अटक करायला लावली. अशा व्यक्तीला पक्षात घेऊ नये अशी मागणी आम्ही वरीष्ठांकडे केली आहे.

सुधाकर बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहे. त्यांचा मुलगा एका गोळीबार प्रकरणी अडकला होता. या सर्वांमध्ये कारवाई होऊ नये म्हणून ते भाजपमध्ये येत असतील असे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. बडगुजर हे मनपाच्या प्रत्येक टेंडरमध्ये सहभागी आहेत. ते ज्या पक्षात होते त्यांच्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे अशा लोकांना आमच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आमचे वरिष्ठ असा निर्णय घेणार नाहीत, बडगुजर यांची प्रतिमा मलिन आहे. त्यांना किती मते मिळाली त्यामुळे त्यांना घेतांना पक्षनेते दहा वेळा विचार करतील असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचाही विरोध
सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बाँम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनीही बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते. त्यामुळे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील असे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी साठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोपही प्रसिद्ध झाले आहेत. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे वंदनीय बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील असे तिदमे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुधाकर बडगुजर शिंदेच्या शिवसेनेत जाणार? शिंदेचे नाशिक महानगरप्रमुख म्हणतात….

Next Post

नाशिकमध्ये या भागात पाणीप्रश्न गंभीर; ‘शिवसेना, सत्कार्य’चे नागरिकांसह जलकुंभावर चढून आंदोलन

Next Post
IMG 20250604 WA0297

नाशिकमध्ये या भागात पाणीप्रश्न गंभीर; ‘शिवसेना, सत्कार्य’चे नागरिकांसह जलकुंभावर चढून आंदोलन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गैरसमजांना थारा देऊ नये, जाणून घ्या, रविवार, ८ जूनचे राशिभविष्य

जून 7, 2025
Sanjay Sonawane e1749305042190

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी…संजय सोनवणे

जून 7, 2025
rain1

या तारखेपासून मान्सूनचा प्रवाह सक्रिय होईल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 7, 2025
Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

जून 7, 2025
Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

जून 7, 2025
Gsxxx2wXEAACwwb 1024x684 1

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011