मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. राजकीय क्षेत्रात काम करताना कोकण विभागाचा विकास व्हावा, यासाठी राणे पिता-पुत्र कार्यरत असताना काही वादग्रस्त विधाने असो की जुन्या वादातून उद्भवलेली प्रकरणे, याचा या पिता-पुत्रांना नेहमीच फटका बसत असतो. सध्या आमदार नितेश राणे यांच्या बाबतही असेच घडले आहे
आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी नितेश राणे यांनी धाव घेतली, त्यावेळी त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे. परंतु निर्णयाआधीच नितेश राणे यांना एक धक्का मिळाला आहे. कारण नितेश राणेंना आता मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. एकीकडे नितेश राणे अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात गेले असून त्यावर आज सुनावणी होत असताना दुसरीकडे या निर्णयामुळे त्यांना जामीन मिळाला तरी मतदान करता येणार नाही, सहकार विभागाने १६ कोटींच्या थकीत कर्जामुळे नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारला आला आहे. यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.
खरे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या भोवती फिरत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली . केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली . संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली. नोटीसनुसार, वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे.