नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत ११० जागांवर अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत विद्यमान आमदार असलेल्या १०५ जागांबरोबरच समर्थन करणा-या ११ आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यात हा अंतिम निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत ३० टक्के उमेदवार बदलण्याचे ठरले असल्याचेही सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, पंकजाताई मुंडे, रावसाहेब दानवे यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते.
या बैठकीनंतर भाजपचे सर्व नेते दिल्लीतून माघारी परतले. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले.
आता ज्या जागावर वाद आहे. त्या जागांवर आता शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे.