नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अखेर शासकीय विश्रामगृहावर भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांची पंधरा मिनीटे चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे हे पुणे येथे रवाना झाले तर चंद्रकांत पाटील नाशिकच्या आपल्या नियोजीत बैठकीसाठी रवाना झाले. पाटील व ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे या भेटीची चर्चा होती. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकाला भेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. अखेर ही भेट आज सकाळी झाली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची चर्चा आहेत. तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच हे दोन्ही नेते नाशिक दौऱ्यावर असून या दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावरच आहेत. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकाला भेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. ती आज खरी ठरली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नसले. तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीकडे सर्वांचेच लक्ष होते.
शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, राज ठाकरे यांना नाशिकला भेटलो पाहिजे असे काही नाही, मी त्यांच्या घरी जाऊ शकतो इतके चांगले आमचे संबंध आहे. पण, त्यांच्या माझ्या वेळा जुळल्या तर इथे पण एक कप चहा त्यांच्यासोबत घेईन. नाशिकमध्ये भाजप – मनसे युती होईल की नाही हे सांगणे माझा अधिकार नाही. आमची कोअर कमिटी असते या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर कोणता निर्णय़ घेतला जातो. पंरतु असे काही ठरले नाही. परस्पर काही करण्यासाठी मी प्रसिद्ध नाही असे सांगितले होते. पण, आता त्यांची भेट झाली असून वेळाही जुळल्या आहे. पण, हे दोन्ही नेते विश्रामगृहाच्या बाहेर भेटल्यामुळे त्यांचा चहा मात्र राहिला…