इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार अपूर्व हिरे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक व इंदापूरचे प्रवीण माने यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
त्यांच्यासमवेत शिळा भागवत, मुरलीधर भामरे, संदीपजी पवार, बाबासाहेब चवरे, राजेश जामदार, संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आ. सीमाताई हिरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, राजेश पांडे, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या प्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अपूर्व (भाऊ) हिरे यांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना आज पूर्ण विराम मिळाला. मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी हा प्रवेश झाला. विशेष म्हणजे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कारकिर्दीतील हा पहिला प्रवेश ठरला.
डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्यासह शेकडो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यानंतर हिरे यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगितले.