इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. आता उद्या सायंकाळी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असून चव्हाण यांची वर्णी लागणार आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाचे त्यांनी दर्शन घेतले तसेच भाजपा जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी कल्याण जिल्हाध्यक्ष के आर जाधव, वयोवृद्ध मार्गदर्शक बापूसाहेब मोकाशी यांचे आशीर्वाद घेतले.
राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपा विचारधारेची पाळेमुळे आणखी बळकट करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शुभाशीर्वाद आणि बळ द्यावे, हीच गणरायाचरणी प्रार्थना चव्हाण यांनी केली.