पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. याच तपासात पोलिसांनी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मृत्यूपूर्वी फोगट यांना त्यांच्या सहकाऱ्यांनीच जबरदस्तीने ड्रग्ज दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पार्टीतील फुटेज गोवा पोलिसांच्या हाती लागले आहेत. ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
फोगाट यांच्या हत्येप्रकरणी हा एक धक्कादायक खुलासा गोवा पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट यांना ड्रग्ज देण्यात आलं, त्या हॉटेलचे दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुजेट पोलिसांच्या हाती लागले आहे. यात फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान याने त्यांना पाण्याच्या बाटलीतून जबरदस्तीने ड्रिंक दिल्याचं कळते. त्यानंतर सोनाली फोगाट यांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही. इतर सहकाऱ्यांनी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्याचं दिसून येतंय. प्राथमिक तपासात सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप फोगाट यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानुसार, सोनाली यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना सध्या अटक केली आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ रिंकू यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे त्यांचा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर संगवान आणि सुखविंदरसिंह या दोघांनीच सोनाली फोगाट यांचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यातच पोलिस तपासानुसार, सोनाली फोगाट यांची हत्या कशी झाली, त्याचा काही घटनाक्रम समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोव्यातल्या हॉटेलमध्ये पार्टीदरम्यान, सुधार सांगवान आणि त्यांचा साथीदार आणि सोनाली हे तिघे दिसतात.
विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये सोनाली यांना जबरदस्तीने बाटलीतून एक ड्रिंक देण्यात आल्याचं दिसलं. सुधीर सांगवान याने पोलिसांच्या चौकशीत, त्यांना ड्रिक्समद्ये ड्रग्स किंवा केमिकल दिल्याचं कबूल केले असून हे ड्रिंक प्यायल्यावर सोनाली यांचा स्वतःवर ताबा राहिला नाही. चार-साडे चार वाजता त्यांना तशाच अवस्थेत बाथरुमकडे नेण्यात आलं. तेथे त्या दोन तास होत्या.
प्राथमिक चौकशीनुसार, सोनाली यांच्या हत्येसाठी हे दोन्ही आरोपी जबाबदार असल्याचं दिसून येतंय. सोनाली यांच्या शरीरावर काही जखमा दिसून आल्या आहेत. मात्र सोनाली यांचा मृतदेह उचलताना त्या जखमा झाल्याचं आरोपींनी चौकशीत सांगितले आहे. तसेच सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आरोपींवर केला जात आहे. तसेच सोनाली यांच्या संपत्तीवरही आरोपींचा डोळा असल्याचं फोगाट यांच्या भावाने आरोप केला आहे. सोनाली फोगाट यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिस्सार येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा यांनी चुलत भावासोबत मिळून सोनाली यांच्या मृतदेहाला अग्नी दिला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपात शामिल झालेले कुलदीप बिश्नोई हेदेखील अंत्यसंस्कारावेळी पोहोचले होते.
BJP Leader Sonali Phogat Death Case Investigation
Goa Police Drug CCTV Footage Drink Murder