मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता निमित्त आहे ते त्यांनी लिहिलेल्या पत्राचे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून भाजपमध्ये सध्या पंकजा यांना डावलले जात असल्याचे बोलले जाते. गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी एक पत्र लिहीले आहे. हे पत्र पंकजा यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. येत्या १२ डिसेंबरला वडिलांच्या जयंती दिनी नवा संकल्प करणार असल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या काय संकल्प करणार, काही नवी घोषणा करणार की अन्य काही याची चर्चा सुरू झाली आहे. बघा, पंकजा यांचे पत्र