मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना आणि त्यांच्या पुत्राला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पंकजा या दुसऱ्यांचा कोरोना बाधित झाल्या आहेत. पंकजा या गेल्या काही दिवसांपासून विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या आहेत. पंकजा आणि त्यांचा पुत्र आर्यमान हे दोघेही येथील घरी विलगीकरणात असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या बाधेसंदर्भात पंकजा यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना पहिल्यांदा कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांनी तशी माहिती ट्विटरद्वारे दिली होती. आता मात्र त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही.
https://twitter.com/Pankajamunde/status/1477295094944264195?s=20
ओमायक्रॉनची लागण?
पंकजा यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यांना ओमिक्रॉनची बाधा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://twitter.com/Pankajamunde/status/1387631927583145986?s=20