नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या भारतीय राजकारणाबद्दल सर्वसामान्य जनतेत फारसे चांगले बोलले जात नाही, परंतु सध्याही असे काही थोडे नेते आहेत की, त्यांच्याविषयी जनतेमध्ये आदराची आणि चांगल्या कार्याबद्दल अभिमान व कौतुकाची भावना आहे, त्यापैकीच एक म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गडकरी सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी गडकरी म्हणाले होते की, राजकारण सोडून द्यावंसं वाटतं. त्यानंतर काही दिवसांनीच गडकरींना भाजपने राष्ट्रीय समितीतून वगळले. त्यामुळे गडकरी हे आता भाजपचे लालकृष्ण अडवाणी होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मंत्रीपद गेलं तरी मला काही फरक पडत नाही. त्यांचे हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जात आहे.
देशभरातील रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांनाच जाते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र भाजपमधील सर्वोच्च समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने ते चर्चेत आले होते. पक्षाच्या संसदीय समितीमधून त्यांना वगळण्याची घटना हा मोठा धक्का मानला जात होता.
परंतु आता वेगळ्या संदर्भात गडकरी यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नितीन गडकरीच्या अशाच एका भाषणाची सध्या चर्चा होतेय. महात्मा गांधी यांच्या एका विधानांचा संदर्भ देत नितीन गडकरींनी मेळघाटातील जुना किस्सा उपस्थितांना ऐकवला.
ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘नोकरशाही के रंग’ पुस्तक प्रकाशन समारंभात गडकरींनी मेळघाटातील पायाभूत सुविधा विकसित करताना आलेल्या अडथळ्यांचा अनुभव सांगितला. दरम्यान यापूर्वी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की,
मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती.
तसेच राजकारणात असतानाही नितीन गडकरी अनेकदा निर्भीडपणे आपलं मत मांडत असतात. याची प्रचिती याआधीही अनेकदा आली असून, नुकतंच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगताना आपण कशा प्रकारे अधिकाऱ्यांना ‘मंत्रीपद गेलं तरी काही फरक पडत नाही’ सांगितलं होतं याची आठवण सांगितली.
नितीन गडकरी यांनी यावेळी काही जुने किस्से सांगताना मेळघाटातील कुपोषणाच्या मुद्द्यावर भाष्य केले, यादरम्यान त्यांनी आपण कशाप्रकारे तिथे रस्ते बांधण्यासाठी निर्णय घेतला याची आठवण करुन दिली. “आपला निर्णय गरिबाच्या हिताचा असेल आणि त्याला न्याय मिळणार असेल तर कायदा तोडा असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. पण वैयक्तिक स्वार्थ किंवा इतर कोणतं उद्दिष्ट असेल तर ते चुकीचं आहे. मी महाराष्ट्रात मंत्री असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अडीच हजार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हाहाकार माजला होता. त्यावेळी आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मला ही नेमकी काय स्थिती आहे, मेळघाटातील ४५० गावात एकही रस्ता नाही याबद्दल विचारणा करायचे,” असं गडकरींनी सांगितलं.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1562083485971787777?s=20&t=Nxru0JdhE8yAdwuSSDVUbw
गडकरी पुढे म्हणाले, मी मंत्री असल्याने बैठका घेत असायचो. अधिकारीही बैठकीला असायचे. एकदा मनोहर जोशी यांनी त्यांना ‘इतकी लोकं मेली तुम्हाला काहीच वाटत नाही का? मुलं शाळेत नाही जाऊ शकत, वीज नाही आणि तुम्ही वन पर्यावरण कायद्यांअंतर्गत काहीच करु देत नाही’ अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने ‘माफ करा, पण मी असहाय्य आहे, काहीच करु शकत नाही’ असं उत्तर दिलं”.
परंतु यानंतर मला राहावलं नाही. हे काम माझ्यावर सोडा, काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, पण मी हे काम करणार असं मी अधिकाऱ्याला सांगितलं. तुम्हाला शक्य झालं तर माझ्या पाठीशी उभे राहा, नाही राहिलात तरी हरकत नाही. मंत्रीपद गेलं तरी चालेल असं म्हटलं होतं,” अशी आठवण गडकरींनी सांगितली.
गडकरी पुढे म्हणाले की, मग मी एक फाईल तयार केली. संबंधित विभागांकडून नंतर ती फाईल माझ्याकडे आली. त्यामध्ये मी मानवाधिकाराच्या दृष्टीने या ४५० गावात रस्ते नसणं दुर्भाग्यपूर्ण आहे. हे त्यांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक शोषण आहे. यासाठी परवानगी न देणं चुकीचं आहे. कायदा काहाही सांगत असला तरी, मंत्री या नात्याने मी या ४५० गावात रस्ते तयार करण्याचा आदेश देत आहे. यानंतर कायद्याच्या आधारे कोणाला जबाबदारी घ्यायची असेल तर मंत्री असतानाही आणि नसतानाही यासाठी मी जबाबदार असेन असं मी लिहून दिलं होतं,” असं गडकरींनी सांगितलं. मी ४५० गावात रस्ते बांधले. आपण मंत्री असतानाही गरीबाला न्याय देऊ शकत नसू, तर त्याचा फायदा काय ? असंही गडकरी यावेळी स्पष्ट केले.
BJP Leader Nitin Gadkari Statement on Minister ship
Union Minister Politics Delhi Program