मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या राजकीय पुढाऱ्यावर किती कर्ज आहे आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे, याची माहिती आपल्याला निवडणुकीच्या शपथपत्रातून मिळते. बरेचदा या माहितीवर किती विश्वास ठेवावा, हा प्रश्नच असतो. मुंबईचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याबाबतीत अशीच एक घटना अलीकडे घडली.
आशिष शेलार यांच्यावर ७ हजार ७०० रुपयांचे कर्ज असल्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात होत आहे. आणि त्याचे कारण स्वतः शेलारांनीच दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सतत एक फोन येत आहे. या फोनवरील व्यक्ती त्यांना कर्जाची रक्कम फेडण्यास सांगत आहे. शेलार यांनी आपली ओळख त्याला सांगितली तरीही त्या फोनवरून सातत्याने त्यांना फोन येतो. आपण कर्ज घेतले असून आपली ७ हजार ७०० रुपयांची रक्कम थकित आहे. आपण ही रक्कम तातडीने फेडावी, असा फोन एका कंपनीतून येत आहे.
ही एखादी खाजगी फायनान्स कंपनी असावी, असा अंदाज शेलार यांना आला. पण त्यांना सर्वांत आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटले की त्यांनी आपली ओळख सांगूनही कंपनीतील लोक घाबरेलेले नाहीत. अखेर शेलार यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तोतयागिरी, फसवणूक, गुन्हा करण्याचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन येत आहे, तो नंबरही ट्रॅकिंगला लावण्यात आला आहे.
मी कर्ज घेतलेच नाही
गेली दोन वर्षे आशिष शेलार वारंवार त्यांना सांगत आहेत की, मी कर्ज घेतले नाही आणि मी कुणाच्या कर्जाचा गॅरेंटरही नाही. तरीही कंपनीचे कॉल्स थांबलेले नाहीत. सायबर क्राईमची टीम आता संबंधितांच्या ट्रॅकवर आहे.
BJP Leader MLA Ashish Shelar Vandre Police Station Complaint
Cyber Crime Loan Fraud Call