मुंबई – आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे ठाकरे सरकारसाठी माफियाचे काम करीत असल्याचा अतिशय गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या सोमय्या यांनी आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाच लक्ष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सोमय्या म्हणाले की, आयपीएस अधिकाऱ्याला सरकारचे माफीया म्हणून काम करता येत नाही. हे विश्वास नांगरे पाटील यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी मला बेकायदेशीरपणे घरात डांबून ठेवले. कोल्हापूरला जाण्यात रोखण्यामध्ये त्यांचाही हात असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५०० रुपयांचे कंत्राट बळजबरीने आपल्या जवळच्या लोकांना दिले आहे. याची तक्रार मी केली आहे. राज्यपालांनाही याबाबत पत्र दिले आहे. आता कुठल्याही क्षणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सोमय्या म्हणाले.