.
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध राजकीय नेते आणि खासकरुन विरोधकांवर विविध घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमी चर्चेत असतात. कधी ते त्यांनी केलेल्या आरोपांमुळे तर कधी त्यांच्या आरोपांचे पुढे काय झाले यामुळे चर्चा झडत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी विविध आरोप केले. आणि आता हेच मुश्रीफ भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता सोमय्या काय करणार या प्रश्नावर सोशल मिडियात अनेक पोस्ट व्हायरल झाला. त्यातच आता खुद्द सोमय्यांचीच फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई सायबर सेलकडे एक तक्रार केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, तीन तरुणांनी वैद्यकीय मदतीच्या नावाखाली त्यांची ३६०० रुपयांची फसवणूक केली आहे. निखील गायकवाड, अक्षय गायकवाड आणि सौरभ निकम अशी या तीन तरुणांची नावे आहेत. या तिन्ही तरुणांनी सोमय्यांकडे वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर सोमय्या यांनी या तरुणांना ३६०० रुपयांची मदत केली. मात्र, या मदतीबद्दल सोमय्या यांनी केईएम हॅास्पिटलला विचारणा केली. मात्र, या तीन तरुणांनी फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर सोमय्या यांनी या तरुणांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार केली.
ही बाब लक्षात येताच या तरुणांनी सोमय्या यांना गुगल पे मार्फत ३६०० रुपये पाठवले. पण, हे तरुण अजून काही आमदारांची फसवणूक करत असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. सोमय्या यांनी सायबर सेलला दिलेले पत्र असे