इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात भाजप नेते व व्यापारी राजू झा उर्फ राकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच या गोळीबारात आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. आसनसोल-दुर्गापूर भागात ही घटना घडली. वर्धमान येथील शक्तीगड येथे काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा ते एका दौऱ्यावर जात होते.
अचानक गोळी लागल्याने झा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी त्याचा साथीदार ब्रेथिन मुखर्जी यालाही गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. दुर्गापूर येथे कोलकाता येथे जात असताना वाटेत आमरा येथे एका मिठाईच्या दुकानाबाहेर काहीतरी खाण्यासाठी थांबले. तेव्हा काही हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एका आरोपीने त्यांच्या कारची काच एका रॉडने तोडली, तर दुसऱ्याने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. झा यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य दोघे जखमी झाले. हॉटेल व्यावसायिक असलेल्या झा यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना कोळसा तस्करीच्या प्रकरणात अटकही झाली होती.
हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. मात्र या हत्येचे नेमके कारण अजून समजू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे. राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
BJP Leader Gun Shot Dead Murder Crime