रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गिरीश महाजन यांनी घेतली अमित शहांची भेट; काय झाली चर्चा? मंत्रिमंडळ विस्तार की अन्य काही?

जुलै 29, 2022 | 10:38 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FYxOzmmaIAAPmwt

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्तांतर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला देखील बरोबर एक महिना झाला आहे, परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे दररोज त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. तसेच वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याची माहिती आता समोर येत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची म्हटले जात आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्याने विस्तार रखडल्याचे सांगण्यात येते, विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला यात शंका नाही. मात्र याबाबत कोणत्याही स्तरावर वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मंत्रिपदाच्या निवडीबाबत कोणताही वाद नाही, आता यात विलंब होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजन आणि अमित शहा यांच्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गिरीश महाजन यांना मोठे खाते मिळण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन भाजपमधील आघाडीवरील नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. गिरीश महाजन हे राज्याचे जलसंपदा मंत्री होते.ते जामनेरचे आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील‌ राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. महाजन सलग‌‌ सहा वेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. महाजन यांची देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातली कामगिरी ही लक्षणीय राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात प्रत्येक आंदोलनाला सामोरे जायला महाजन हजर असायचे. अनेक मोर्चे महाजन यांनी शांत केली आहेत. त्यामुळे महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागणार आहे.

https://twitter.com/girishdmahajan/status/1552702626256498688?s=20&t=EixyE2XuJjWY25M4w9SENw

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र व्यस्त कार्यक्रमात अचानक महाजनांना भेटण्यास अमित शाह यांनी होकार दिला आहे. खुद्द महाजन यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. महाजन यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली, असे महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच अमित शाह यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. अलीकडेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केले. तिथे भाजपचे आमदार आणि महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.

एक महिना उलट त्याला तरी या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना रोज धारेवर धरत आहेत. हम तुम एक कमरे में बंद हो, असे या दोघांचा सरकार आहे. एक दुजे के लिए, असे म्हणात या सरकारवर टीका होत आहे. अशातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सहाजिकच अमित शाह व महाजन यांच्या भेटीत शिजलं काय? अस सवाल, राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे.

राज्यात फक्त भाजपचे सरकार आले असते तर कदाचित गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले असते असे म्हटले जाते. कारण मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले असते, तर त्यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांना शह देण्यात फडणवीस यांना गिरीश महाजन यांनी मोठी साथ दिली असल्याचे सांगण्यात येते.  तसेच गिरीश महाजन यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असो, जळगाव महानगरपालिकेची निवडणूक असो, किंवा धुळे महानगरपालिकेची निवडणूक असो, या सर्व निवडणुकांमध्ये महाजन यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे भाजपसाठी भविष्यातील मोठे नेतृत्व म्हणून पाहिले जात असून आजही भेट ही राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे. येत्या 3 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. पुढे अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करताहेत. या चर्चेदरम्यान कोणते जिल्हे ते घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळतील यावर चर्चा सुरू आहे. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती आमदार मंत्री होतील. यावर बोलणी सुरू असतील. मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मला असं वाटतं पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल.

एखाद्या वेळास मंत्रिमंडळ विस्तार दोन वेगवेगळ्या टप्प्यात झाला तर 19 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 12 भाजपचे तर शिंदे गटातल्या 7 नेत्यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. केवळ एकाच टप्प्यात विस्तार झाल्यास त्यात भाजपच्या 26 नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील 14 ते 15 नेत्यांना संधी मिळू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गेल्या 30 जूनला झाला. त्याच वेळी शिंदे सरकारने अवघ्या काही दिवसांमध्ये 500 पेक्षा अधिक शासन निर्णयही (GR) काढले. मात्र पण तब्बल एक महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच संपूर्ण राज्याचा कारभार चालवत आहेत.

BJP Leader Girish Mahajan Meet Amit Shah in Delhi Cabinet Expansion Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – फ्लॅटचा वन टाईम मेन्टेनन्स दिलाय? मग हे वाचाच…

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मालेगाव – मनमाड रोड चकाचक, दुतर्फाला रंग रंगोटी (व्हिडीओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
20220729 103233

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मालेगाव - मनमाड रोड चकाचक, दुतर्फाला रंग रंगोटी (व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011