जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते गिरीश महाजन यांची द्वितीय कन्या श्रेया आणि उद्योजक अक्षय यांचा शुभविवाह आज थाटामाटात जामनेर येथे संपन्न झाला. या शाही सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आदी मान्यवरांचा त्यात समावेश होता. हिवरखेडा रोडवर भव्य मंडप आणि अन्य शाही व्यवस्था करण्यात आली होती. व्हीआयपी लाऊंज, हजारो जणांच्या जेवणाची व्यवस्था, पार्किंग, सभामंडप अशा विविध प्रकारच्या बाबींमुळे हा सोहळा चर्चेचा विषय ठरला होता.
भाजप नेते गिरीश महाजन आणि त्यांची पत्नी साधना यांनी नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद दिले. अक्षय अजय गुजर हे चोपडा तालुक्यातील आहेत. ते आय़टी इंजिनीअर आहेत. विशेष म्हणजे, गुजर घराणे हे राजकीय क्षेत्रातले नाही. अक्षय यांची फूड इंडस्ट्री आहे. गुजर कुटुंब हे सध्या पुण्यात आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ उत्साहात संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून या विवाह समारंभाची जय्यत तयारी सुरू होती. विविध राजकीय पक्षातील मान्यवर सोहळ्यास हजर होते.
बघा या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ खालील लिंकवर
http://https://fb.watch/bSWoq5EgF8/