इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चेन्नई पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, भाजप नेत्यानेच त्याची कार स्वतः पेटवली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात भाजप नेत्याची कार पेटवण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भाजपचे सचिव सतीश कुमार यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला त्यात ही बाब निदर्शनास आली आहे.
https://twitter.com/ysathishreddy/status/1515684960446865412?s=20&t=xkzh20Rm81L7OQmVVjkpBQ
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सतीश कुमारला चौकशीसाठी बोलवले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने कबुल केले की त्यानेच कारला आग लावली. कार विकून दागिने घेण्याची मागणी पत्नीकडून सुरू होती. त्यास कुमार हे टाळाटाळ करीत होते. अखेर स्वतःच कारला आग लावायची आणि कारच्या विम्यातून येणाऱ्या पैशांमधून दागिने घेण्याचा कट नेत्याने रचला होता. मात्र, आता त्याचा हा प्लॅन अयशस्वी झाला आहे.