मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, राज्य सरकारने बोलविलेली सर्वपक्षीय बैठक, भोंग्यांचा वाद आणि राणा दाम्पत्याला अटक अशा सर्व विषयांबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच आसूड ओढले. राज्यात गुंडांचे सरकार सुरू आहे. खासदार नवनीत राणा यांना अक्षरशः अत्यंत वाईट वागणूक कोठडीत देण्यात येत आहे. त्यांना साधे वॉशरुमलाही जाऊ दिले नाही, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली पण या बैठकीला मुख्यमंत्रीच अनुपस्थित होते. त्यामुळे या बैठकीला काहीच अर्थ नाही. मुंबईत ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय तो केवळ मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आहे. सरकारला वाटत असेल की विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले केले तर विरोध आणि टीका बंद होईल तर तो त्यांचा भ्रम आहे. उलट आम्ही आता आणखी आक्रमकपणे सरकारच्या विरोधात बोलत राहू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद बघण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1518492800907587584?s=20&t=i3ansFpTG_R8WhJMseHtsg