मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारकडून सध्या ओबीसी आरक्षणाबाबत एम्पिरीकल डाटा गोळा केला जात आहे. मात्र, या कामात प्रचंड गोंधळ सुरू असल्याचा आरोप विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ओबीसींच्या संख्या घटलेली दिसेल अशा पद्धतीने हे काम होत आहे. हे सरकार नेहमीच उशिरा जागे होते. म्हणून मी आजच सरकारला इशारा देतो आहे. याचा संपूर्ण तपशील योग्य वेळी मी देईनच, असे फडणवीस यांनी सांंगितले आहे. बघा यासंदर्भात ते काय म्हणताय याचा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1536325972043366400?s=20&t=6C13hApCS149I2V8eBa5Gw