मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते आणि विधीमंडळातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती स्वतः फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. फडणवीस यांनी सांगितले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी माझ्याच घरात विलगीकरणात राहत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्वरीत कोरोना चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळेच बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या व खासदार प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता फडणवीस यांनाही बाधा झाली आहे. हे तिन्ही राजकीय नेते गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क आला आहे. आणि आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1533340392157982725?s=20&t=hsRJA0uFrd84Tkv1ICDUUw