मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री उर्फी जावेद आणि राज्य महिला आयोग यांच्यावर पुन्हा भाजप नेत्या चित्रा वाघ कडाडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ या उर्फीवर सातत्याने टीका करीत आहेत. आजसुद्धा वाघ यांनी उर्फीसह राज्य महिला आयोगाला लक्ष्य केले आहे. वाघ म्हणाल्या की, भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. राज्य महिल आयोग समर्थन करतंय का? आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही? भररस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
वाघ पुढे म्हणाल्या की, विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही? #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग याचं समर्थन करतंय का? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1610527270690770944?s=20&t=2G-enFlcrKke1ftrd8H0sg
समाजस्वास्थ्यासाठी स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन करणे अयोग्य असल्यानेच उर्फी जावेद हिने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अंगप्रदर्शनाला विरोध करणे जरुरीचे आहे. अशा अंग प्रदर्शनातून आपण लेकी- बाळींपुढे कोणता आदर्श ठेवणार आहोत याचा विचार पक्षभेद विसरून सर्वांनी करावा. या विषयाचे राजकारण न करता सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सावित्रीमाईंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.
वाघ यांनी म्हटले आहे की उर्फी जावेद हिने कोणता पेहराव करावा काय बोलावे याला माझा मुळीच आक्षेप नाही. माझा विरोध सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अंगप्रदर्शन करण्याला आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथे अशा पद्धतीने शरीराचे हिडीस प्रदर्शन करणे योग्य आहे का? आपल्या घरातल्या लेकी बाळींपुढे अशा विकृतीचा आदर्श ठेवायचा का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा विषय राजकारणापलीकडचा आहे हे उर्फीचे समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेऊन माझ्या भूमिकेवर टीका करावी.
सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. पेहरावाचे भान सवंग प्रसिद्धीसाठी राखले जात नसेल तर त्याला नंगट मानसिकताच म्हटले पाहिजे. महिला सक्षमीकरणाचा जागर करताना स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून बाजार मांडला जाऊ नये. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असेही श्रीमती वाघ यांनी या पत्रकात नमूद केले आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1609406488480747520?s=20&t=2G-enFlcrKke1ftrd8H0sg
BJP Leader Chitra Wagh on Urfi Javed and Women Commission
Politics Naked Dress