मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयएनएस विक्रांत या युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणखीन आक्रमक झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून सोमय्या यांना अटक होणार का, सोमय्या हे पोलिसांसमोर हजर का होत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता सोमय्या यांनी त्यांची पहिली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी आम्ही प्रतिकात्मक ११ हजार रुपये जमा केले होते. तरीही ५८ कोटी रुपये जमा केल्याचे सांगणाऱ्या राऊत यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. पोलिसांकडेही नाहीत. त्यामुळे यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालयासमोर आम्ही सर्व पुरावे आणि कागदपत्रे सादर करणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले आहे. बघा, ते काय म्हणाले याचा व्हिडिओ
https://twitter.com/KiritSomaiya/status/1513758065216081921?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q