पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणातील चाणक्य म्हणविल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भीती का वाटायची, याबाबतचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. फडणवीसांनी २०१४-१९ या काळात ज्यापद्धतीने काम केलं आहे, अशा स्थितीत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील १५ वर्षे सत्तेत येता येणार नाही, अशी भीती शरद पवारांना वाटत होती. शरद पवारांनी मान्य केले की, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी त्यांनी सारे षडयंत्र रचले होते. माझे व्यक्तिगत मत आहे की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून त्यांनी साऱ्या युक्त्या केल्या. खरे तर, शरद पवारांना भीती वाटत होती की, देवेंद्र फडणवीसांनी ज्यापद्धतीने २०१४ ते २०१९ काम केले. त्यानंतर राज्याने आम्हाला बहुमत दिले. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पुढील १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्याची कुठलीच संधी राहणार नाही, असे विधान बावनकुळेंनी केले आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे षडयंत्र झाले आहेत. जेवढे राजकीय पक्ष तोडले गेले, हे पक्ष कुणी तोडले? आम्ही तर बहुमताने निवडून आलो. आमची युती तोडण्याचे कामही शरद पवारांनी केले. त्यांच्या पार्टीला कधी १०० च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांची पार्टी नेहमची ७५ च्या खाली राहिली. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच पक्षांची तोडफोड केली. शिवसेनेला आज त्यांनी उद्धवस्त करून टाकले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
BJP Chief Chandrashekhar Bawankule on Morning Oath