नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्ण अपयशी होते. त्यांच्या मंत्र्याचे दाऊदबरोबर संबंध स्पष्ट झाले आणि त्याला तुरुंगात जावे लागले तरीही उद्धव ठाकरे त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढू शकले नाहीत. सत्तेसाठी त्यांनी लाळघोटेपणा केला. वाझेसारख्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही त्यांनी लाळघोटेपणा केला. अशा बेईमान, विश्वासघाती आणि घरकोंबड्या व्यक्तीने मा. देवेंद्रजींसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीबद्दल अशा रितीने बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांना भाजपा शेवटची संधी देत आहे. आता पुन्हा त्यांनी आमच्या नेत्याबद्दल अशी टिप्पणी केली तर आम्हालाही मातोश्रीसमोर यावे लागेल आणि मग तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही.
त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना सन्मानाने वागवले. ते विसरून स्वतः बेईमान असलेले उद्धव ठाकरे मा. देवेंद्रजींबद्दल अशी टिप्पणी करतात. आज मा. देवेंद्रजींबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा ओलांडली आणि उपकारांची अशी परतफेड केली. मा. देवेंद्रजी आजही संस्कारांची मर्यादा पाळतात. त्यांनी आपले संस्कार दूर ठेऊन रौद्र रूप दाखविले तर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात राहणे मुश्कील होईल एवढी सामग्री मा. देवेंद्रजींकडे आहे.
LIVE |? कोरडी | माध्यमांशी संवाद https://t.co/16OKdwyyVU
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 4, 2023
BJP Chief Bawankule on Uddhav Thackeray Politics