नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकल्याने भाजपही त्यांना घेरण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील शाळांबाबत जे काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये छापले गेले ते पैसे देऊन छापले गेले, असा आरोप आता भाजपने हातवारे करत केला आहे.
भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यासह आप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘न्यूयॉर्क टाईम्स आणि खलीज टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा शब्द आणि शब्द सारखा आहे. दोन्ही लेखात ६ छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत, तीसुद्धा सारखीच आहेत. असेच काही अक्षरशः दोन-तीन वर्तमानपत्रात छापून आले तर ती बातमी आहे का? की ती एक जाहिरात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, ‘केजरीवाल सकाळी म्हणाले की, असे फोटो न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापले जात नाहीत, हे छापून येणे खूप अवघड आहे, केजरीवालांच्या याच वक्तव्याचा आधार घेत वर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला की किती पैसे देऊन हे प्रकाशित करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या आणि मोठ्या वर्तमानपत्रात एकच लेख छापलेली मी कधीच पाहिली नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
मनोज तिवारींचेही आरोप
दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी दोन्ही वृत्तपत्रांची बातमी ट्विट करून मोठा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले, ‘लो जी इथेही पकडले गेले. न्यूयॉर्क टाईम्स आणि खलीज टाईम्समध्येही तेच शब्द… लेखकही तेच… निर्लज्ज आप दिल्लीतील लोकांचे फोटो छापण्यात पैसे वाया घालवत आहेत.
अरविंद केजरीवाल म्हणाले होते की उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने टाकलेला छापा हा त्यांच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम आहे. ज्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. ते म्हणाले होते की, “अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे आणि मनीष सिसोदिया यांच्या चित्राचे कौतुक केले जात आहे त्याच दिवशी केंद्र सरकराने सिसोदियांच्या निवासस्थानी सीबीआयला पाठवले.”
दरम्यान, या प्रकरणावरुन दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. भाजप आणि आप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भाजपच्या आरोपांवर आता आपकडून काय उत्तर दिले जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्ली भाजपची पत्रकार परिषदेचा व्हिडिओ खालीलप्रमाणे
MP Shri @p_sahibsingh is addressing a Press Conference. https://t.co/lJmpdvm4AM
— BJP Delhi (@BJP4Delhi) August 19, 2022
BJP Ask How Same Article published in 2 Newspapers
Delhi Politics BJP AAP New York Times Khalij Times
Manish Sisodia CBI Raid Press Conference Arvind Kejriwal