सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजप आणि शिंदे गटात असमन्वय; अखेर घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 1:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री नाराज झाले होते. मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर निधी वाटपात झालेल्या दुजाभावावरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. आता ही अस्वस्थता दूर करवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयासाठी आशिष कुलकर्णी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचे काम कुलकर्णी यांच्याकडे असणार आहे.

शिंदे गटातील आमदार आणि भाजप यांच्यामध्ये पदांवरुन दुजाभाव केला जात असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना चांगलेच डिवचले होते. शिवसेनेनेही हा मुद्दा उचलून धरून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. दोन्ही गटांमध्ये समन्वय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यामागे कुलकर्णी यांनी मोठी भूमिका निभावली होती. राज्यसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची एक टास्क फोर्स नेमली होती. त्यात कुलकर्णी यांचा समावेश होता. या शिवाय या फोर्समध्ये गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता.

दरम्यान, कुलकर्णी यांच्या राजकीय प्रवासाचा विचार करता आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजप असा आशिष कुलकर्णी यांचा प्रवास राहिला आहे. शिवसेनेत असताना ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या थिंकटँकमध्ये आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता. कुलकर्णी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कुलकर्णी सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

पडद्यामागचे सूत्रधार
भाजप आणि शिंदे गटात वाद होऊ नये, सुसंवाद-सुसूत्रता राहावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशिष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपची रणनिती आखण्यात आशिष कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. महाराष्ट्रातील सत्तांतरासाठी गुप्त हालचाली झाल्या होत्या. त्यावेळी आशिष कुलकर्णी हे पडद्यामागचे सूत्रधार होते.

BJP and Shinde Group Coordination Decision
Ashish Kulkarni Eknath Shinde Devendra Fadanvis Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस काटकर यांचा नाशिक दौरा; कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

Next Post

MH-CET परीक्षेत झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा; धनंजय मुंडे

India Darpan

Next Post
munde

MH-CET परीक्षेत झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा; धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011