इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा हादरा बसला आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आता यांच्यासह नाशिकमधील तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये आज भाजपमध्ये प्रवेश केला.
आज भाजपमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, यांच्यासह भाजप सोडून गेलेले माजी नगरसेवक गणेश गीते, कमलेश बोडके यांच्यासह काही पदाधिका-यांचा समावेश आहे.
या प्रवेश सोहळ्यावर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीका-यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!
राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काही पदाधिका-यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला ब्रेक लागला आहे. त्यात नवनिर्वाचित शिवसेना महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला आहे.