नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे तर धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा प्रवेश सोहळा निश्चित झाला आहे. २ जुलैला हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
अपूर्व हिरे शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली होती. अपूर्व हिरे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यानतंर ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना ठाकरे गटात गेले. त्यानंतर पुन्हा अजित पवार गटात आले. त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार सीमा हिरे यांच्या नाशिक पश्चिम मतदार संघातील ते नेते आहेत. याअगोदर या मतदार संघातून ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला होता. पण, यावेळेस त्यांनी अपूर्व हिरे यांचे मात्र स्वागत केले आहे.
तर कुणाल पाटील हे धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रमुख नेते आहे. या भागात त्यांचे वर्चस्व आहे. ते राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून समजले जातात. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.