इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २९ जून रोजी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
३० जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दुपारी ३ ते ५ या वेळात हे अर्ज दाखल करता येतील.
१ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रदेश अध्यक्षांच्या व राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी दिली आहे.