इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकाचे दोन माजी नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. या दोन नगरसेवकांनी आपला राजीनामा जिल्हा अध्यक्षकांकडे दिला आहे. डोंबिवलीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
या दोन नगरेसवकांनी भाजपमध्ये बाहेर पडण्याच्या निर्णयामागे स्थानिक राजकारण आहे. नेतृत्वाकडून सहाकार्य व विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. पण, आमदार रविंद्र म्हात्रे यांच्या समजुतीनंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. आजूबाजूच्या वार्डात भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
राजीनामा दिल्यानंतर म्हात्रे यांनी कुठल्या पक्षात प्रवेश करणार यावर बोलतांना सांगितले की सर्वच पक्षांशी चर्चा सुरु आहे. पण, शिवसेना ठाकरे गटाकडून मानसन्मान मिळाल्यास आम्ही त्या पक्षात प्रवेश करु असे संकेत त्यांनी दिले. एकीकडे शिवसेन ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असतांना दोन माजी नगरसेवकांनी प्रवेश करण्याचे संकेत दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा तर भाजपला मोठा धक्का बसला आहे.