बुधवार, ऑक्टोबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एक दिवस उलटत नाही तोच भाजपने सुधाकर बडगुजर यांना दरवाजे उघडले?….बावनकुळे यांनी दिले संकेत

by Gautam Sancheti
जून 5, 2025 | 3:18 pm
in संमिश्र वार्ता
0
Chandrashekhar Bawankule


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहे. ज्यांचे संबध दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊन नये अशी मागणी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केली. त्याला एक दिवस उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांना पक्षाची दारे उघडे करुन दिली. आज नाशिकमध्ये ते आले असता त्यांनी सांगितले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहे. पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले आहे. असे सांगत त्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिका-यांचा विरोध आहे. त्याबाबत चर्चा केली जाईल असे सांगून बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले की फक्त आरोप आहे. ते सिध्द झाले नाही.

काल आमदार हिरे यांनी बडगुजर हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असे बातम्यांमधून कळाले. आमच्यामध्ये असा कोणताही विषय नाही. चर्चा नाही. मी बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना बजगुजर यांनी त्रास दिला. आमच्या नेत्यांवर त्यांनी आक्षेपार्ह टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतींत चुकीची बातमी दिली. तसेच नारायण राणे यांना भरल्या ताटावरुन त्यांनी अटक करायला लावली. अशा व्यक्तीला पक्षात घेऊ नये अशी मागणी आम्ही वरीष्ठांकडे केल्याचे सांगितले होते.

सुधाकर बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहे. त्यांचा मुलगा एका गोळीबार प्रकरणी अडकला होता. या सर्वांमध्ये कारवाई होऊ नये म्हणून ते भाजपमध्ये येत असतील असे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. बडगुजर हे मनपाच्या प्रत्येक टेंडरमध्ये सहभागी आहेत. ते ज्या पक्षात होते त्यांच्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे अशा लोकांना आमच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आमचे वरिष्ठ असा निर्णय घेणार नाहीत, बडगुजर यांची प्रतिमा मलिन आहे. त्यांना किती मते मिळाली त्यामुळे त्यांना घेतांना पक्षनेते दहा वेळा विचार करतील असेही त्यांनी सांगितले. पण, एक दिवस उलटत नाही तोच बडगुजर यांना भाजपने दार उघडे केले.

शिवसेना शिंदे गटाचाही विरोध
सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बाँम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनीही बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते. त्यामुळे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील असे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी साठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोपही प्रसिद्ध झाले आहेत. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे वंदनीय बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील असे तिदमे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृध्दी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण…६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार

Next Post

नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ अशिमा मित्तल यांचा मास्टरस्ट्रोक….हे दोन निर्णय कायम मार्गदर्शक ठरणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
CM
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑक्टोबर 1, 2025
IMG 20250930 WA0113 1024x683 1
संमिश्र वार्ता

राज्यातील खेळाडूंना मिळणार वैद्यकीय विमा कवच….तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ऑक्टोबर 1, 2025
mukt
संमिश्र वार्ता

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑक्टोबर 1, 2025
FB IMG 1759251177526 e1759280625272
स्थानिक बातम्या

नाशिकच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट…या गंभीर प्रश्नांवर केली सविस्तर चर्चा

ऑक्टोबर 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी सामंजस्याने निर्णय घ्यावे, जाणून घ्या, बुधवार, १ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 1, 2025
gov e1709314682226
संमिश्र वार्ता

राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती; या तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

सप्टेंबर 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद शिक्षकातून ‘केंद्र प्रमुख’ पदांवर नियुक्तीसाठी या तारखेदरम्यान ऑनलाईन परीक्षा

सप्टेंबर 30, 2025
Next Post
IMG 20250102 WA0190

नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ अशिमा मित्तल यांचा मास्टरस्ट्रोक….हे दोन निर्णय कायम मार्गदर्शक ठरणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011