बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाडच्या या सहकार नेत्याचा शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश…भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी केले सर्वांचे स्वागत

by India Darpan
मे 21, 2025 | 6:49 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 02

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते रमेशचंद्र घुगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाची ध्येयधोरणे ही जनसामान्यांच्या कल्याणासाठी असल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वामुळे विकसित भारत व विकसित महाराष्ट्र घडणार असल्याचा विश्वास असल्याने श्री. घुगे यांनी भाजपा प्रवेश केला आहे. भाग्यश्री सहकारी पतसंस्था, ज्ञानदीप बहुउद्देशीय विकास सेवा संस्था, शेतीमाल खरेदी विक्री व प्रक्रीया सहकारी संस्था, नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक संघ नाशिक, नाशिक खादी व ग्रामोद्योग उत्पादक संघ तसेच नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थेचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करणारे घुगे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला अधिक ताकद मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या हितासाठी भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे घुगे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये खंडेराव चव्हाण, रामदास सानप, विठ्ठलराव गचाले, सुरेश कातकाडे, विजय कातकाडे आदींचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून वादविवाद टाळावे, जाणून घ्या, बुधवार, २१ मेचे राशिभविष्य

Next Post

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू…मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

Next Post
Untitled 40

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू…मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011