मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुती सरकारच्या आजच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत – महंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहे.
पण, या सोहळ्याला शरद पवार, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले हे उपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार व राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याचेही बोलले जात आहे. शरद पवार हे संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळे उपस्थितीत राहणार नाही. तर राज ठाकरे हे वैयक्तिक कारणास्तव येणार नाही.
या सोहळ्याला सत्ताधारी पक्षांबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही फोन करुन आमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व खासदार व आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या सोहळ्यात कोण कोण उपस्थितीत राहतं ही उत्सुकता आहे.