मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले.
या बैठकीत निरीक्षक म्हणून आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते. आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली असून त्यातही फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बाबनकुळे, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, अशोक चव्हाण, गिरीष महाजन, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, पराग अळवणी यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.