इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमधील भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली असून त्यात १६ मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. या यादीत बहुतांश चेहरे हे जुनेच आहे. समोर आलेल्या यादीत दोन महिलां आमदारांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या संभाव्य यादीत कोकणमधून रविंद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक यांचा समावेश आहे. तर मुंबईत मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातळकर, पश्चिम महाराष्ट्र – शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, विदर्भ- चंद्रशेखर बाबनकुळे, संजय कुटे, उत्तर महाराष्ट्र – गिरीष महाजन, जयकुमार रावल, मराठवाडा – पंकजा मुंडे, अतुल सावे यांची नावे आहे.
भाजपला या नव्या मंत्रिमंडळात २१ ते २२ मंत्रीपदे मिळू शकतात. यातील १६ संभाव्य नावे अद्याप समोर आली आहे.