इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली जोरात सुरु झाल्या आहे. शिवसेना शिंदे गटाने व अजित पवार गटाने विधीमंडळ नेत्याची निवड केल्यानंतर आतापर्यंत भाजपने गटनेता निवडला नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात होते. आता उद्या मुंबईत केंद्रीय निरीक्षक माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, निर्मता सितारमण हे येणार आहे. त्यानंतर भाजप आमदारांची बैठक ४ डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे दावा केला जाणार आहे.
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आता हालचाली जोरात सुरु झाल्या आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिततीत राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. .