मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास भेट देऊन वंदन केले. त्यानंतर शिवसेनेने स्मारकाचे शिवसैनिकांनी शुध्दीकरण केले. यावरुन भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेनवर हल्ला करत ही अतिशय संकुचीत मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे अशी टीका केली आहे. ज्यांनी स्मारकाचे शुध्दीकरण केले त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजली नाही असेही त्यांनी सांगितले. त्यांनी या विषयाबरोबर इतर विषयांवरही पत्रकारांशी संवाद साधला…