गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हरलो, तर मुंडन करून मिशा भादरणार… भाजपच्या या मंत्र्यांचे विधान

by India Darpan
नोव्हेंबर 12, 2024 | 5:01 pm
in संमिश्र वार्ता
0
bjp11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः राजस्थानचे भाजप मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांचे विधान राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. खिंवसार येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी आपल्या निवडणुकीतील विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आणि निवडणूक हरलो तर मिशा काढून आणि मुंडन करील, असे ते म्हणाले. हे विधान एकीकडे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास दर्शवते, तर दुसरीकडे निवडणुकीच्या वातावरणातील आक्रमकतेचे आणि स्पर्धेचेही दर्शन घडवते.

खिंवसार यांनी असेही सांगितले, की त्यांचा पक्ष अपमान करणाऱ्या विरोधी पक्षांविरुद्ध निवडणूक लढवत आहे. या निवेदनात त्यांनी आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास तर दिसत होताच; पण या निवडणुकीतील विजय केवळ आपल्या पक्षाचा नसून, परिसराचा आणि जनतेच्या विकासाचा विजय असेल, असे मत व्यक्त केले. खिंवसर यांनी आपल्या कामाचा आढावा लोकांसमोर घेतला. निवडणूक जिंकून पहिल्यांदा मंत्री झाल्यावर खिंवसर यांनी या भागातील विकासकामांना प्राधान्य देत कालव्याच्या पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम केल्याचे सांगितले. ते म्हणाले. आपल्या पक्षाने या भागात केलेली विकासकामे हेच त्यांच्या विजयाचे कारण असून या वेळीही त्यांचा निवडणूक प्रचार याच विकासकामांवर आधारित असेल.

ते म्हणाले, की मी येथून निवडणूक लढवली, तेव्हा खिंवसर येथील मतदान केंद्रावर मला ९५ टक्के मते मिळाली होती. राजस्थानमधील सात विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होत असून त्यात खिनवसार, देवली-उनियारा, दौसा, झुंझुनू, रामगढ, सालुंबर आणि चौरासी या जागांचा समावेश आहे. या जागांवर भाजप आणि इतर विरोधी पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, गजेंद्रसिंह खिंवसार यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे या निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मातीचा ढिगारा कोसळून चार महिलांचा मृत्यू

Next Post

लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन दुचाकीस्वारांनी ४२ वर्षीय व्यक्तीचे केले अपहरण…नाशिकरोडला गुन्हा दाखल

Next Post
crime114

लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन दुचाकीस्वारांनी ४२ वर्षीय व्यक्तीचे केले अपहरण...नाशिकरोडला गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011