इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः आघाडीचा सर्व योजना सत्तेच्या लालसेपोटी आहेत. त्या विचारधारांचा अपमान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोका देणाऱ्या आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे, की ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबद्दल दोन चांगले शब्द बोलायला सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणीही नेता दोन वाक्ये बोलू शकतो का? असे सवाल त्यांनी केले.
शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपचे संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध करण्यात आले. केंद्र असो की राज्य; आम्ही जो संकल्प करतो, तो आमचे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही पूर्ण करतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतर्विरोध असलेले आघाडीचे जे लोक सरकार स्थापन करण्याचे स्वप्न घेऊन निघाले आहेत; त्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेने ओळखले तर बरे होईल, असे शाह म्हणाले.
आज येथे प्रसिद्ध करण्यात आलेले संकल्पपत्र हे महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. एक प्रकारे महाराष्ट्र अनेक युगांपासून प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. एक काळ असा होता, जेव्हा ज्याची गरज होती, ती भक्ती चळवळही महाराष्ट्रातून सुरू झाली. गुलामीतून मुक्तीची चळवळही छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीचीही सुरुवातही महाराष्ट्रातून झाली. आमच्या संकल्पपत्रातून महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते, असे त्यांनी नमूद केले.