नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी २५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. पहिली ९९ उमेदवारांची यादी अगोदर जाहीर केली होती. त्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर २५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या तिन्ही यादीत भाजपने आतापर्यंत १४६ उमेदवारांची नावे घोषित केले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असतांना महायुतीने २६० जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. यात भाजपने १४६, शिवसेना शिंदे गट ६५, राष्ट्रवादी अजित पवार गट ४९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन पक्ष आहे. या तिन्ही पक्षात काही जागांवर मतभेद आहे.
बघा संपूर्ण यादी….