इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रचार सुरु करुन आघाडी घेतली आहे. दरम्यान भाजपने या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या ८ भाजप नेत्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
या यादीत माजी मंत्री रणजित चौटाला आणि माजी आमदार देवेंद्र काद्यान यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपमध्ये हरियाणात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे पक्षाने थेट हकालपट्टीचे हत्यार उगारत बंडखोरांना धडा शिकवला आहे.