नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सातपुर येथील डेमोक्रॅासी हॅाटेलमध्ये भाजपचा मेळावा दुपारी दीड ते चार दरम्यान संपन्न होणार आहे. या मेळाव्यात ७५० भाजपचे पदाधिकारी उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे उपस्थितीत राहणार आहे.
मंगळवारी अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यानंतर सांयकाळी छत्रपती संभाजी नगर येथे मेळावा झाला. आता नाशिकमध्ये व त्यानंतर कोल्हापूर येथे मेळावा होणार आहे.
या मेळाव्यामुळे भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अमित शाह मार्गदर्शन करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॅा. राहुल आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील केदार, नाना शिलेदार, पवन भगुरकर हे प्रयत्नशील आहे.