मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौ-यावर असून ते भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहे. या भेटीत आगामी महानगरपालिका निवडणुकीची व्यूहरचनेसाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या दौ-या निमित्त मात्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चाही रंगली आहे. या पदासाठी आशिष शेलार, व चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान आशिष शेलार यांनी या चर्चेला काही अर्थ नसल्याचे सांगितले. पक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले.
२०१९ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलाची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर १६ जुलै २०१९ रोजी भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या. दोन वर्षाहून अधिक काळ पाटील यांनी हे पद भूषविले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकीत भाजपने यश मिळवले. पक्षात जेष्ठ नेते असलेले चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामुळे भाजपची पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढली आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवणे भाजपला इतके सोपे नाही.
दरम्यान दिल्तीत पुणे येथून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची चर्चा आहे. तर चंद्रकात बावनकुळे यांची सुध्दा दिल्ली वारी आहे.त्यामुळे नेमके दिल्लीत काय सुरु आहे. याबाबत मात्र वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे.