नवी दिल्ली – भाजपकडून राज्यसभेसाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल व माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन जागेसाठी हे नाव जाहीर केले असले तरी तिस-या जागेची घोषणा अजून केली नाही. दरम्यान धनजंय महाडिक यांचे नाव तिस-या जागेसाठी चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्राबरोबरच भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.
https://twitter.com/BJP4India/status/1530909242810863616?s=20&t=XMn6ECRed09scFAIq-BlxA