नाशिक – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी नाशिकमध्ये असून त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यासह विविध कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ वाजता ते औरंगाबादहून ओझर विमानतळावर येणार आहे. त्यानंतर २.१० वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोहर गार्डन येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते ४ वाजता भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यकर्मानंतर ते विविध विकास कामाचे उदघाटन करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा असा असेल दौरा









